सोलापूर : भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी, 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी (जुने) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पूनम गेट इथं सकाळी 11.00 वा. जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने चरणबध्द आंदोलनाच्या तिसर्या टप्प्याचे विविध मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांना 10 सप्टेंबर रोजी संघटनांच्या वतीने निवेदने देण्यात आले होते. तर 17 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते.
या मुद्द्यांवर जेल भरो आंदोलन होणार -
1)बोध गया महाबोधी विहारावर ब्राम्हणांचा अनधिकृत कब्जाआहे.तो कब्जा हटवुन ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे.
2)सर्व निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूका घ्याव्या.
3)ओबीसींसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
4)आदिवासी नागरिकांवर होत असलेले अत्याचाराच्या विरोधात.
5)मुस्लिमांची मॉबलिंचिंग थांबवा.
6)धर्मांतरित आदिवासी व ख्रिश्चन यांच्याशी होत असलेल्या भेदभावपुर्ण व्यवहाराच्या विरोधात
7)एस.सी.,एस.टी.व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागु करण्यात यावे.
8) सोलापूर शहर व जिल्ह्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे.
9)सोलापूर शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा.
10)जुनी पेन्शन योजना तात्काळ लागु करा.
11) कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात
12)खाजगी क्षेत्रातील श्रमिक,मजुर व कर्मचाऱ्यांना सन्मानजनक पेन्शन लागु करण्यात यावी.
13)नवीन शैक्षणिक धोरण २०२० द्वारा बहुजन समाजाच्या विरोधात अमलात येत असलेल्या निती विरोधात....
14)खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पालकांची सुरु असलेली आर्थिक लुट तात्काळ थांबविण्यात यावी.
15)शेतक-यांचे हक्क, अधिकार व न्यायाच्या समर्थनार्थ.....
16) EWS आरक्षण हे असंवैधानिक असुन हे आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे.
17) सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्यात यावा.
18)सोलापूर शहरातील कचरा व मोकाट कुत्र्यांचा, जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा.
19. MSEDCL चे खाजगीकरण ताबडतोब थांबवावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन करण्यात येत आहे.
तरी मूलनिवासी बहुजन समाजातील सर्व बुद्धिजीवी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक -युवती व सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड व शहराध्यक्ष राजू तुळसे यांनी केलं आहे.
