संभाजी ब्रिगेड महिला आघाडी शहराध्यक्षपदी सौ. मनीषा कोळी

shivrajya patra

सोलापूर : संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये शहर महिला आघाडी अध्यक्षपदी सौ. मनीषा कोळी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. मनीषा कोळी या गेल्या वर्षभरापासून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून व शिवश्री प्रवीण गायकवाड यांच्या विचाराने व नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील प्रत्येक सामाजिक आंदोलनात व महिलांच्या प्रश्नासाठी अग्रभागी होऊन काम करत असतात. या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
To Top