भारतरत्न बिस्मिल्लाह खान सांस्कृतिक कार्यक्रमात मोहम्मद अयाज सन्मानित

shivrajya patra

मुंबई : येथे भारतरत्न बिस्मिल्लाह खान यांच्या स्मृति दिनी शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे पार पडलेल्या "यादें बिस्मिल्लाह" या सांस्कृतिक कार्यक्रमात सोलापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

लोढा ग्रुप चे मंजु मंगल प्रभात लोढा, पद्मश्री शास्त्रीय गायिका सोमा घोष, पद्मश्री तबला नवाज पंडित सुरेश तलवलकर, सदगुरू दयाल, भाजपा चे प्रवक्ता विनोद शेलार, संगीतकार विवेक प्रकाश, मालती जैन (अध्यक्ष- एस. पी. जैन एज्युकेशन सोसायटी) फिल्म डायरेक्टर शुभांकर घोष तसेच गायक, संगीतकार, अभिनेते-अभिनेत्री, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शास्त्रीय व उप शास्त्रीय  सुगम संगीत गायनाचा  सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या 'यादें बिस्मिल्लाह' सांस्कृतिक कार्यक्रमात गुणवंत कलाकारांचा सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी मोहम्मद अयाज यांनी भारतरत्न बिस्मिल्लाह खान यांच्या मानस पुत्री पद्मश्री सोमा घोष यांचं मनस्वी आभार व्यक्त केलं. आपण मला या ठिकाणी सन्मान देऊन माझ्या कलेची दखल घेण्यात आली, ही बाब संपूर्ण सोलापुरकरांसाठी अभिमानास्पद आहे.

--- छायाचित्रात : राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पद्मश्री सोमा घोष, पद्मश्री सुरेश तलवलकर, मंजु मंगल प्रभात लोढा, सदगुरू दयाल, विवेक प्रकाश आणि अन्य मान्यवर दिसत आहेत.

To Top