मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. 03 मध्ये शिक्षक दिनानिमित्त पार पडला शिक्षकांचा सन्मान सोहळा
सोलापूर : “ समाजाला खऱ्या अर्थाने घडविण्याचे कार्य शिक्षक करत असून अशा शिक्षकांचीच समाजाला खरी गरज आहे. त्यांच्या योगदानामुळे समाजामध्ये परिवर्तन घडू शकते.” असं प्रतिपादन प्रमुख पाहुणे तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी केले.
जोडभावी पेठेतील मंगळवार बाजार, मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. 03 मध्ये बुधवारी, 03 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने एच. एम. सामाजिक संघटना, मित्र नगर, सोलापूरतर्फे अचानक शाळेला भेट देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. 
प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, सादिक हुंडेकरी, हुसेनबा शा शेख, फुरकान रामपूर मौलाना, हाफिज मुतव्वली तसेच माजिद बगवान उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुसेन बागवान होते. या सन्मान समारंभात प्रथमेश कोठे बोलत होते.
या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम शेख, शिक्षिका नाझिया शेख, महबूब्बी शेख, सनोबर शेख, शबनम नदाफ, अलमास पीरजादे आणि बालवाडी शिक्षिका बीबी हाजरा, सुनीता पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 
कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका जबिन मुल्ला यांनी केलं तर सूत्रसंचालन नाझिया शेख यांनी केले.
