सोलापूर : एखादा लोकसेवक, एखाद्या कामासाठी सामान्य नागरिकाकडं लाच रक्कमेची मागणी करतो, त्यावेळी त्या नागरीकाला त्याची तक्रार नोंदविणं सोयीस्कृत व्हावं, अन् त्या कामाला गती यावी याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडून 9404001064 हा कायमस्वरुपी वॉट्सअप मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारचे अधिकारी, शासन अनुदानीत मंडळे/संस्था यांचे अधिकारी/कर्मचारी, महापालीका/नगरपालीका/जिल्हापरिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी-कर्मचारी इत्यादी लोकसेवकांचे भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास अगर लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास 
नागरीकांनी त्यासंबंधीची तक्रार पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, रंगभवन चौक, सोलापूर येथील फोन नंबर, टोल फ्री क्रमांक व तसेच नवीन जारी करण्यात आलेल्या 9404001064 या कायमस्वरूपी वॉट्सअप मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केलं आहे.
01) फोन नंबर 0217- 2312668
02) टोल फ्री क्रमांक - 1064
03) नवीन वॉट्सअप मो.क्र. - 9404001064
