सोलापूर : मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळासह सर्व महामंडळांचा वेळेवर मिरवणुकास प्रारंभ करून मध्यरात्रीपर्यंत गणेशाचं विसर्जन होईल, असे प्रयत्न असल्याचं दिसतंय. त्याच वेळी या मिरवणुका सुरळीपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून त्यात जवळपास 2,000 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्डसह राज्य राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी तैनात असल्याचं सांगण्यात आलंय.
सोलापुरात आज शनिवारी गणनायकाला निरोप देण्यासाठी शहरातील सार्वजनिक तरुण मंडळाची जय्यत तयारी झालीय. त्यातच यंदा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डीजे वापरावर निर्बंध आल्याने पारंपारीक वाद्यांसह निघणाऱ्या मिरवणुका आपल्या नयनात साठवून ठेवण्यासाठी अधिक गर्दी करतील, असा अंदाज आहे.
पोलीस बंदोबस्ताची 1 पोलीस आयुक्त, 3 पोलीस उप आयुक्त, 7 सपोआ, 25 पोनि, 100 सपोनि/पोसई, 1358 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड आणि १ कंपनी SRPF अशी आकडेवारी आहे.
या बंदोबस्तासाठी बाहेरुन 1 DySP, 25 प्रशि.पोसई, 25 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड, 1 SRPF कंपनी असे मनुष्यबळ प्राप्त झाले आहे. मिरवणुक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता म्हणून शहराच्या प्रमुख ठिकाणी १ शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु असल्याचं माहिती कक्षातून सांगण्यात आले.
