सोलापूर : जीएसटी क्रमांक देण्यासाठी 05 हजार रुपयांची लाच घेतल्याने राज्य जीएसटी विभागातील दोन अधिकाऱ्यांना येथील एलसीबी पथकानं गुरुवारी रंगेहाथ पकडल्यावर गुन्हा दाखल झाल्यावर गजाआड केलं होतं. उभयतांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयांने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले.
राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी (वय ४१, रा. हरिश्चंद्र नगर, धाराशिव) आणि राज्य कर निरीक्षक आमसिध्द ईरण्णा बगले (वय ५०, रा. रेणुका नगरी, जुळे सोलापूर) अशी अटक झालेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. आदेशानंतर त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आलीय.
एका मक्तेदाराची कन्ट्रक्शन व सर्व्हिस फर्म असून नवीन जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी त्यांनी जीएसटी कार्यालयाकडे अर्ज केला होता. तो मंजूर करण्यासाठी आरोपींकडून 05 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. बगले यांनी ती रक्कम स्वीकारून ती चौधरी यांच्या टेबलवर ठेवत फाइल ठेवली. त्यावेळी उभयतांना पकडण्यात आले.
या दोघांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत चौगुले यांनी दिलीय.
