विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्वल निकम यांच्या हस्ते मानाच्या 'श्री पणजोबा गणपती' ची महापूजा

shivrajya patra

सोलापूर : येथील पत्रा तालीम येथे मानाच्या श्री पणजोबा गणपतीची महापूजा विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्वल निकम यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाली. यावेळी पत्रा तालीम युवक मंडळ व लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने खा. निकम यांचा भरजरी फेटा बांधून त्याचबरोबर श्रींचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खा.उज्वल निकम यांनी पत्रा तालीम मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांचं मुक्त कंठानं कौतुक केले.

यावेळी पत्रा तालीम मंडळाचे ज्येष्ठ नेते हुसेन पैलवान, मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, बापू जाधव, उत्तम कोलारकर, अंबादास शेळके, लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष दत्ता भोसले, कार्याध्यक्ष योगेश क्षीरसागर, पत्रा तालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे, उपाध्यक्ष बसवराज कोळी, सेक्रेटरी राजू हुंडेकरी, माजी अध्यक्ष ओंकार जाधव, सुहास कोलारकर, सचिन स्वामी, ॲड. अक्षय बन्ने, ओंकार भुरळे यांची उपस्थिती होती.

To Top