... वाहतुक नियमावलीच्या बडग्याआडून होणाऱ्या कारवाईपासून नागरिकांना द्यावा दिलासा : संभाजी ब्रिगेड

shivrajya patra

सोलापूर : आगामी काळात गणेश उत्सव, गौरी आगमन नवरात्र महोत्सव दिवाळी हे सण तोंडावर आले आहेत. त्यामुळे पुरुष महिला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर  पडत आहेत, पण चौका-चौकात वाहतूक पोलीस कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात दंड वसुली करीत आहेत. त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत आहे, तरी किमान सणासुदीच्या काळामध्ये वाहतूक नियमात शिथिलता देण्यात येऊन वाहतुक कारवाईपासून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन यांच्याकडं करण्यात आलीय.

आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव-गौरी आगमन, नवरात्रोत्सव अशी मोठी सण-उत्सव साजरा करण्यात येणार आहेत. सण-उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात यावा, या येणार्‍या सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पुरुषाबरोबर महिलावर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, त्यांच्याबरोबर लहान मुलंसुद्धा असतात, अशा वेळी चौका-चौकांमध्ये वाहतूक पोलीस त्यांना अडवून नियमावलीच्या बडगा दाखवून मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम आकारणी वा वसुली करीत आहेत. अशा वेळी महिला वर्गाकडे पैसे असतात नसतात. त्या कारवाईच्या भीतीने रडकुंडीला येऊन विनंती केली, तरी वाहतूक पोलीस कारवाई करतात. 

काही ठिकाणी हे वाहतूक पोलीस आपल्या पर्सनल मोबाईलमध्ये वाहनांचे फोटो काढून दंड आकारणी करीत आहेत, जे अनुचित असल्याचा शासनाचा निर्णय आहे. अशा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असंही या निवेदनात म्हटलं आहे. 

वाहतूक पोलिसांनी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे असून त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे काही चौकाचौका गल्ली गल्लीमध्ये चार-पाच वाहतूक पोलीस नागरिकाकडून कारवाईच्या नावाखाली दंड आकारणी करताना दिसतात. 

शहरामध्ये सध्या सण-उत्सव दिवस असल्यामुळे प्रत्येक बाजारपेठ मुख्य चौकात वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक खोळंबा होत आहे. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी जास्तीत-जास्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे श्याम कदम, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर उपप्रमुख फिरोज सय्यद, इलियास शेख, बालाजी काकडे आदी उपस्थित होते.

To Top