गरीब मुलांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया; जी. के. फाउंडेशन पुणे चा अभिनव उपक्रम

shivrajya patra

पुणे : गरीब आणि गरजू लहान मुलांच्या आयुष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुण्यातील जी. के. फाउंडेशन पुढे सरसावले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालकांना आपल्या मुलांची महागडी हृदय शस्त्रक्रिया करवून घेता येत नाही. या समस्येवर उपाय म्हणून ३ महिने ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची सर्व प्रकारची हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याची मोठी संधी जी. के. फाउंडेशनकडून उपलब्ध करून दिली आहे.

या उपक्रमांतर्गत –

🫀 हृदयाला छिद्र असणे

🫀 डिव्हाईसच्या साहाय्याने छिद्र बंद करणे

🫀 तसेच सर्व प्रकारच्या जटिल हृदय शस्त्रक्रिया

👉 या सर्व शस्त्रक्रिया आता पूर्णपणे मोफत करून मिळणार आहेत.

या मोहिमेमुळे गरीब कुटुंबांचा आर्थिक भार कमी होणार असून, असंख्य लहान मुलांचे जीव वाचणार आहेत.

जी. के. फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष गुंडाप्पा खडके यांनी सांगितले की –

“प्रत्येक लहानग्याला जगण्याचा हक्क आहे. पैशाअभावी कोणत्याही मुलाचे जीवन अंधारात जाऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. समाजातील प्रत्येकाने हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून गरीब मुलांना मदत करावी, हीच आमची विनंती आहे.”

अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 7517510741

To Top