पुनर्रचीत हवामान आधारीत फळपीक विमा योजना; शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण

shivrajya patra

कृषी उत्पादनात फळपिकांचा वाटा दिवसेंदिवस वाढत असून, हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी पुनर्रचीत हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेचा उद्देश : हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे फळपिकांचे उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, हा योजनेचा मुख्य हेतू आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांवर नोंदवलेल्या माहितीच्या आधारे पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, आर्द्रता यांचे विश्लेषण करून विमा संरक्षण दिले जाते.

समाविष्ट फळपीके : मृग बहार

डाळिंब, पेरू, लिंबू, चिक्कू, सीताफळ, मोसंबी 

अंबिया बहार डाळिंब, द्राक्ष, आंबा, पपई, केळी, मोसंबी 

योजनेची वैशिष्ट्ये : - अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू 

- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक 

- भाडेपट्टी व कुळाने शेती करणारे शेतकरी पात्र 

- जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा नोंदणी 

- एकाच फळपिकासाठी एका हंगामात एकच अर्ज 

- उत्पादनक्षम वयाच्या बागांसाठीच विमा संरक्षण 

--- विमा हप्ता व संरक्षित रक्कम (निवडक उदाहरणे)

 | पिक | बहार | अंतिम मुदत | शेतकरी हिस्सा ₹ | संरक्षित रक्कम ₹ |

|-----|-------|--------------|------------------|------------------|

| डाळिंब | मृग | 14 जुलै | 8000 | 160000 |

| पेरू | मृग | 14 जून | 3500 | 70000 |

| द्राक्ष | अंबिया | 15 ऑक्टोबर | 19000 | 380000 |

| आंबा | अंबिया | 31 डिसेंबर | 8500 | 170000 |

| पपई | अंबिया | 31 ऑक्टोबर | 2000 | 40000 |

| मोसंबी | गारपिट कवच | 31 ऑक्टोबर | 1650 | 33000 |

(सर्व हप्त्यांमध्ये राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा वेगळा आहे)

अर्ज प्रक्रिया : शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक, प्राथमिक कृषी पत संस्था किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अधिक माहितीकरिता संपर्क : कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

To Top