सोलापूर : अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या पुढाकाराने आणि अथक परिश्रमाने कुचन प्रशाला येथे जगातील सर्वात मोठी, तब्बल २६० फुटांची श्री मार्कंडेय महामुनींची भव्य चित्रकृती साकारण्यात आली. या अनोख्या आणि भव्य उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदी साठी अप्लाय करण्यात आला आहे, ज्यामुळे पद्मशाली समाजाचे नाव जगाच्या पटलावर अभिमानाने कोरलं गेलं आहे.
'ही चित्रकृती साकारताना केवळ कला आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले नाही, तर समाजातील एकतेचे, श्रद्धेचे आणि संस्कृतीबद्दलच्या प्रेमाचेही दर्शन घडले. श्रीनिवास संगा यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे हा उपक्रम शक्य झाला. त्यामुळेच या कार्याचे जनक म्हणून त्यांचा श्रीनिवास यन्नम कामटे मित्र परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, ॲड. नरेंद्र भंडारी, ॲड. रोहन सोमा, ॲड. महेश इंजामुरी यांसह अनेक मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजातील तरुण पिढीला प्रेरणा देणारे कार्य असल्याचे सांगितले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या चित्रकृतीची नोंदीसाठी आवेदन दाखल झाल्याने पद्मशाली समाजाचा जागतिक स्तरावर सन्मान असून, ही कामगिरी समाजाच्या इतिहासातील 'सुवर्ण' अक्षरात लिहिली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
ही भव्य कलाकृती केवळ एक रेकॉर्ड नसून, श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक प्रयत्नांचे जिवंत उदाहरण आहे.
