प्रात:काळी 'हर्र बोला हर्र...' च्या जयघोषात निघाली ६८ लिंग पदयात्रा; 9 तास 18 किलोमीटर पायी चालली यात्रा

shivrajya patra

महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे ; 68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजनचा उपक्रम

सोलापूर : प्रति वर्षाप्रमाणे यंदाच्या 50 व्या वर्षीही तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली.

पदयात्रेत भक्तगणांनी हर्र बोला हर्र... चा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यात आले.

बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली व 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहसचिव संजय साखरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, अरुण पाटील, मन्मथ कपाळे, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, गंगाधर झुरळे, आनंद जाधव, श्रीनिवास बल्ला, रमेश अलकुंटे, संजय फुले, एकनाथ पवार, सिद्धाराम वच्चे, संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते.

सकाळी ७ वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पदयात्रेचा समारोप दुपारी ३ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला.

पदयात्रेच्या मध्यंतरात चाटी गल्ली येथील बुबणे जैन मंदिर येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले. तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी शांतविर भजन मंडळाचे अध्यक्ष मल्लेश पेद्दी यांच्या वतीने फराळ देण्यात आले.

पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे-स्वामी, बसवराज बेऊर, धानेश सावळगी, मल्लिनाथ सोड्डे, महेश गुड्डद, दीपक पटणे, महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.

महाविद्यालयीन तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

प्रिया शेटे, श्वेता दोडमनी, स्नेहा दोडमणी, अंजली जाधव, श्रुती इगडे, अर्पिता गंगदे, अश्विनी यादवाड, ऐश्वर्या कालदीप, गायत्री गुंजले यांच्यासह मोठ्या संख्येने महाविद्यालयीन युवतींनी पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

To Top