सोलापूर : येथील हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस संशयीतरित्या फिरत असलेल्या तरूणाचा पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे दुचाकीसंदर्भात केलेल्या चौकशीत ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यास गजाआड करण्यात आलंय. साहिल महेबूब शहापूरे (वय-22 वर्षे) असं नांव आहे. त्याच्या चौकशीत, त्यानं सोलापुरातील विविध ठिकाणावरुन 11 मोटारसायकली चोरल्याचं निष्पन्न झालंय.
दक्षिण सदर बझार भागातील बेरिया हॉलसमोर पार्क केलेली MH13/DF7304 क्रमांकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा 01 ऑगस्ट रोजी सदर बझारर पोलिसांकडे दाखल होता. सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाकडं गुन्हा तपासावर असताना, सपोनि सागर काटे व त्यांचं पथक गस्त घालत आसताना, 06 ऑगस्ट रोजी पोअं/विशाल बोराडे व पोअं/हणमंत पुजारी यांना एक संशयीत चोरीस गेलेल्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
साहिल शहापूरे (रा. 333, दक्षिण सदर बझार, अशोक नगर, मुर्गी नालाजवळ, सोलापूर) यास पोलीस ठाण्यात आणून दुचाकी संदर्भात केलेल्या चौकशी ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. मोटार सायकल चोरी गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोह/सागर सरतापे यांनी जप्त केली.
साहिल महिबूब शहापूरे याला पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असता, त्यानं शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन 11 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी 08 मोटार सायकली चालू स्थितीत तसेच 03 मोटार सायकली या तोडुन त्याचे पार्ट वेगवेगळे केल्याचे सांगितले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 2,31,400 रुपये असल्याचे पोलीस सूत्राने सांगितलं आहे.
त्यात सदर बझार पो. ठाणे कडील 06 गुन्हे, एमआयडीसी पो. ठाणे कडील- 02, फौजदार चावडी पो. ठाणे कडील 01 गुन्हा, जेलरोड पो. ठाणे कडील 01 गुन्हा व इतर - 01 असे 11 गुन्हे उघडकीस आले. त्याचेकडुन चोरी केलेल्या चालू स्थितीतील 08 मोटार सायकली तसेच 03 मोटार सायकलीचे स्क्रप केलेले वेगवेगळे पार्ट, पंचनाम्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्या. या गुन्ह्यांपैकी आरोपीतानं स्क्रैप केलेल्या मोटार सायकल ह्या त्यानं त्याच्या दुकानी केले असून, दुकान त्याचे वडिल महेबूब शहापूरे यांच्या नावे आहे.
त्यांना त्यांचा मुलगा मोटार सायकल चोरी करतो, याची जाणीव असताना देखील त्यांनी त्यांचे दुकान आरोपीस स्क्रॅप करण्याकरीता उपलब्ध करुन मदत केली. तसेच आरोपीताने चोरी करुन आणलेल्या मोटार सायकल स्क्रैप करण्यास मदत करणारा महेबूब ऊर्फ बाबू बागवान याने मदत केली. तसेच आरोपी हा मोटार सायकली चोरुन त्याचा स्क्रॅप माल विक्री करतो, हे माहिती असताना देखील गुडलक ट्रेडर्सचे मालक रहिम इरफान शेख यांनी स्क्रैप मोटार सायकलचे पार्ट विकत घेतले, असं गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने त्यांना आरोपी करण्यात आलं आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-2) सुधिर खिरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सागर काटे, सहा. फौजदार औदुंबर आटोळे, पोहेकॉ/शहाजहान मुलाणी, पोहेकॉ राजेश चव्हाण, पोह/संतोष पापडे, पोह/सागर सरतापे, पोह/एयाज बागलकोटे, पोकॉ/ सागर गुंड, पोकॉ/सोमनाथ सुरवसे, पोकॉ/ हणमंत पुजारी, पोकॉ/ विशाल बोराडे, पोकॉ/ अनमोल लट्टे, पोकॉ/ उमेश चव्हाण, पोकॉ/ राम भिंगारे, पोकॉ/परशुराम म्हेत्रे, पोकॉ/ अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.
