प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा कुर्डुवाडीतही निषेध; कठोर कारवाईची मागणी

shivrajya patra

कुर्डुवाडी/प्रतिनिधी : संभाजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, इतिहास संशोधक इतिहासाचे गाढे अभ्यासक, विचारवंत हजारो तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारे नेते प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं रविवारी भाजपच्या भाडोत्री गुंडांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्याच्या निषेधार्थ माढा तालुका सर्व पुरोगामी संघटना/विविध पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकारी कार्यालयात सरकारला निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल,  संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल गवळी, तालुका अध्यक्ष सौरभ भोसले, तालुका उपाध्यक्ष साहेबराव ऊबाळे, प्रशांत बागल,  कुर्डुवाडी शहर अध्यक्ष नवनाथ कडबाणे, काँग्रेस चे सचीन खैरे, आशिष राजपूत, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष अरुण जगताप, लक्ष्मण बागल, मच्छिन्द्र गोडसे, सुहास टोणपे, अमोल खोत, नासिर शेख, बंडू भोसले,  संतोष परबत, प्रशांत जगताप, बाळकृष्ण गोडसे, मच्छिन्द्र कदम, विजयकुमार परबत, धनाजी गोडसे, श्रीकांत गायकवाड, बालाजी जगताप, अल्ताफ मुलाणी, लक्ष्मण माने, संदिप तळेकर, राजाभाऊ व्यवाहारे आदींची उपस्थिती होती.

...चौकट

... व्हावी कठोर कारवाई : हर्षल बागल,

संभाजी ब्रिगेडचे हे नाव एकेरी नसून ते आदरयुक्त आणि प्रेमपूर्वक आहे.  संभाजी, शिवाजी या शब्दांमध्ये ' जी '  हा शब्द आदराने वापरला जातो.  हे आज नाहीतर शेकडो वर्षापासून ' जी ' हा शब्द आदरपूर्वक वापरला जातो.  ज्या व्यक्तींचा इतिहास हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, त्या व्यक्तींना वैचारिक पातळी नाही, ज्यांच्या वरती मोठे गुन्हे दाखल आहेत,  हत्येचा गुन्हा दाखल आहे,  शिक्षा भोगलेले गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं जे भाजपचे पदाधिकारी आहेत.  त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांमध्ये स्वतः लक्ष घालून आरोपींवर कठोर कारवाई करावी.

व्याख्याते हर्षल बागल,

प्रवक्ते - संभाजी ब्रिगेड.

 

To Top