सोलापूर : आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी 01 महिन्यापासूनच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीत वारकर्यांसाठी करावयाच्या नव-नव्या उपाययोजनांचा अभ्यास करून यंदाची आषाढी वारी नीटनेटकी आणि उत्साहात पार पाडल्याने त्यांचा सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर महसूल विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी जंगी सत्कार करून गौरव करण्यात आला.
यावेळी पत्रकार बांधवांनी वारीबाबतचे आपले अनुभव कथन केले आणि जिल्हाधिकार्यांनी वारी काळात केलेल्या परिश्रम अन् मेहनतीचे वर्णन केले.
इतकेच कायतर या यशस्वी वारीचं बुकलेट तयार करण्याचीही मागणी पत्रकारांनी या सत्कारप्रसंगी केली.
या सत्कार सोहळ्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महसूल बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, सचिव मनोज हुलसुरे, प्रमोद बोडके, महेश पांढरे, बाळकृष्ण दोड्डी, शिवाजी सुरवसे, सागर सुरवसे, किरण बनसोडे, संतोष आचलारे, संगमेश जेऊरे, आफताब शेख, प्रशांत कटारे, चंद्रकांत मिराखोर, विष्णू सुरवसे, दीपक सोमा, रोहन श्रीराम, विश्वनाथ बिराजदार यांची उपस्थिती होती.