'लिफ्ट' देण्याच्या बहाण्याने जबरी चोरी; 03 चोरटे गजाआड

shivrajya patra

स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीत 61,000 रुपयांच्या मुद्देमालासह गुन्ह्यातील मोटार सायकली जप्त

सोलापूर : वळसंग पोलिसांकडे दाखल जबरी चोरीच्या गुन्हा सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीत उघडकीस आला. या गुन्ह्यात तपास पथकाने पूणे नाका स्मशानभूमीजवळ थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करता, त्या त्रिकुटाने गुन्ह्याची कबुली दिल्यावर पोलिसांनी तिघांना गजाआड करण्यात केलं. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मालासह गुन्ह्यात वापरलेल्या 02 मोटार सायकलीसह 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 04 जुलै रोजी दुपारच्या सुमारास सिद्धेश्वर कारखान्याजवळून होटगी गावाकडे चालत निघालेल्या तरुणास लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमाने ' सोडतो चला ', असं म्हटले. 

मोटारसायकल बसल्यानंतर त्यानं होटगी येथे सोडण्यास सांगितले असता, त्यावेळी दुसऱ्या एका मोटार सायकलवर आलेल्या दोघांसह तिघांनी मिळून त्यास होटगी येथील साईबाबा मंदिराचे पाठीमागे तलावाजवळील शेतामध्ये नेऊन तिघांनी मिळून तेथे  शिवीगाळ करुन त्याच्या अंगावरील कपडे उतरवून बेल्ट व काठीने मारहाण करून मारहाण केली.

त्या त्रिकुटानं त्याच्या जवळील गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक, स्मार्ट वाॅच, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 29,600 रुपयांचा ऐवज तसेच मोबाईल फोन पे नंबर घेऊन त्यावरुन 7, 900 रुपये असा एकूण 37,300 रूपये किंमतीचा ऐवज जबरीने काढून घेतला.

याबाबत हेमाराम केहराराम जाट (वय- 18 वर्षे, रा. सायंटा ता. बाडमेर, राज्य राज्यस्थान याच्या फिर्यादीनुसार वळसंग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आला. या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सपोनि नागनाथ खुणे, व त्यांचे पथकास घटनास्थळास भेट देऊन आरोपींचा शोध घेऊन घेण्याचे सूचित केले होते. 

सपोनि नागनाथ खुणे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार धनराज गायकवाड यांना, तो गुन्हा मौजे होटगी येथील राहणारा रावण गायकवाड, विकी गायकवाड (रा. सेंटलमेंट काॅलनी, सोलापूर ) व त्यांचा आणखी एका साथीदाराने मिळून केला असल्याची विश्वासार्ह खबर त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली. 

ते जुना पूना नाक्याजवळील स्मशानभूमीजवळ थांबले असून त्यांची सोलापूर बाहेर निघून जाण्याची तयारी सुरु असल्याचीही माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करता, त्यांनी त्यांची नावे विकी दशरथ गायकवाड (रा. सेंटलमेंट फ्री काॅलनी, सोलापूर), विनोद उर्फ रावण शवरप्पा गायकवाड (रा. होटगी) आणि जगदीश उर्फ राजू खाजप्पा संगटे (रा. लहान इरण्णा वस्ती, सोलापूर) अशी असल्याचे सांगितले. 

त्यांच्याकडे वळसंग पोलीस पोलीस ठाण्याकडील जबरी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता, त्या तिघांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केल्यावर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी रोख रक्कम, गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक, मोबाईल फोन, स्मार्ट वाॅच आणि गुन्ह्यात वापरलेल्या 02 मोटार सायकलीसह 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार (अक्कलकोट उपविभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, ख्वाजा मुजावर, मल्लप्पा सुरवसे, सफौ नारायण गोलेकर, पोह/धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, दरेप्पा होनमुरे, प्रसाद मांढरे, महिला अमंलदार सुनंदा झळके,  चापोना/समीर शेख यांनी बजावली.

... चौकट ...

रस्त्याने जाणाऱ्यांना 'लिफ्ट' देऊन त्यांना लुटण्याची या टोळीची नेहमीची पध्दत

सोलापूर ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतलेली गुन्हेगारी टोळी ही सराईत जबरी चोरी करणारी टोळी आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीसांची पथके या टोळीच्या मागावर होती. या टोळीचा प्रमुख विकी दशरथ गायकवाड (वय- 23 वर्षे) याच्यावर सोलापूर शहर पोलीसांनी एम. पी. डी. ए. अंतर्गत कारवाई केली होती. गुन्हा करतेवेळी रस्त्याने जाणाऱ्या इसमांना लिफ्ट देऊन त्यांना एकांतात मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, सोने इत्यादी साहित्य जबरीने काढून घेण्याची या सराईत टोळीची नेहमीची पध्दत होती, असंही पोलिसांनी सांगितलंय.

To Top