सोलापूर : येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने हे जुना पुना नाका येथून कार्यालयाकडे जात असताना, नियंत्रण कक्ष, सोलापूर येथून संदेश प्राप्त झाला की, कोंडी येथून एक कंटेनर क्रमांक KA 63 8612 हा अत्यंत वेगाने व वेडीवाकडी चालवत हैद्राबाद दिशेने जात आहे. त्या वाहनाचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्या चालकाविरुद्ध न्यायालयात खटला पाठवून देण्यात आला. त्यास वेळीच पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टळला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्याचवेळी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे वाहन चालक पोकॉ/1435 पाटील यांना तो कंटेनर जुना पुणे नाका येथून विरूध्द दिशेने हैद्राबाद रोडकडे जाताना दिसला. त्यामुळे, त्यांनी त्यांच्या शासकीय वाहन तात्काळ वळवून घेऊन, सदर कंटेनरचा पाठलाग सुरू केला व नमूद माहिती नियंत्रण कक्ष येथे कॉल करून कळविली. त्यानंतर नमूद कंटेनर शेळगी ब्रीजजवळ पकडला.
त्या वाहन चालकाकडे प्राथमिक चौकशी करून, त्यास जोडभावी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. अशा प्रकारे भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्यास वेळेत पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टळला, असल्याचे पोलिसांचे म्हणणं आह
जोडभावी पोलीस ठाणेकडून या चालकाविरूध्द मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे खटला भरून न्यायालयात पाठवून दिला, त्यावर मा. न्यायालयाने त्या वाहन चालकास 4, 000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे, नमूद कंटेनरवर पेंडीग असलेला एकूण 13,700 रूपये दंडाचा भरणा करून घेतला.
ही कामगिरी सपोआ गुन्हे यांच्या वाहनावरील पोकॉ/1472 सचिन जावळे, चापोकॉ/1435 अमित पाटील, शहर वाहतूक शाखेकडील ग्रेड पोसई इंगळे, तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोह/चेतन रूपनर, पोह/लक्ष्मण घोडके यांनी केली.
