ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका- स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नवीन योजना सुरू

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्या मार्फत "ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका" ही उपयुक्त योजना राबविण्यात येत आहे. या अभ्यासिकेचा मुख्य उद्देश एमपीएससी, युपीएससी तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन जाहिराती पाहण्यासाठी संगणक सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून उमेदवारांना विविध भरती प्रक्रिया आणि त्यासंबंधी अद्ययावत माहिती सहजपणे मिळू शकेल.

ज्या इच्छुक, गरजू व पदवीधर उमेदवारांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, नॉर्थकोट पार्क, सोलापूर येथे दूरध्वनी क्रमांक: 0217-2992956 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

तरी उमेदवारांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, श्रीमती संगीता खंदारे यांनी केले आहे.

To Top