नवीन मीटर बसविण्याला भारत मुक्ती मोर्चा व भीमशक्ती सामाजिक संघटनांचा विरोध; जनआंदोलनाचा इशारा

shivrajya patra

सोलापूर : एम. एस. इ. बी. चे जुने मीटर बदलून अडाणी कंपनीचे नवीन मीटर बसविण्यात येत आहेत. त्याचबरोबर या मोहिमेमागे मोठे षड्:यंत्र असून हा निर्णय रद्द न केल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा भारत मुक्ती मोर्चा व भीमशक्ती सामाजिक संघटनेने एमएसईबी चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना दिलेल्या निवेदनात दिला.

हल्ली सर्वत्र विद्युत महामंडळाचे मीटर बदलण्याची मोहीम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मीटर बदलण्याच्या मागे मोठे षडयंत्र असल्याचे व एम एस इ बी मधील नोकऱ्यांमधील आरक्षण संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा भारत मुक्ती मोर्चा व भीमशक्ती सामाजिक संघटनेसह अनेक सामाजिक संघटनांचं मत आहे.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गुरुवारी, २४ जुलै रोजी भारत मुक्ती मोर्चा व भीमशक्ती सामाजिक संघटनेसह अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एमएसईबी चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना निवेदन देऊन हा निर्णय रद्द न केल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 

याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष राजू तुलसे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष विलास सरवदे, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे रवी राज चंद्रकर, महेश्वर निकंबे व अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

To Top