सोलापूर : रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट व यश डेव्हलपर्स यांच्या सहकार्यने रविवार पेठेतील साईनाथ विद्यालयात यश डेव्हलपर्स चे अध्यक्ष सुयश खानापुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी व्यसपीठावर रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट प्रेसिडेंट रो. बालमुकुंद राठी व ऍन दीपा राठी आणि सेक्रेटर रो. रोशन भुतडा उपस्थित होते.
तसेच यश डेव्हलपर्स ऍन सोनाली खानापुरे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमात गरजूं विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. सचिन तोष्णीवाल व इतर पदाधिकारी रो. अमित इनानी, रो. बसवराज उंबरचे, रो. सागर राठी, रो. राहुल डांगरे, साईनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण यादव व सहशिक्षक आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निपा महेंद्र कुमार पटेल यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेचे सहशिक्षक संजय नरसगोंडे यांनी आभार व्यक्त केले.