पोलीस अधिकारी कानडे यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

shivrajya patra

सोलापूर : मुंबई पोलीस दलातील अधिकारी निलेश कानडे यांच्या वतीने मुमताज नगर येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना कासेगांवचे सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले. या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन सरपंच वाडकर यांनी यावेळी दिले.

लोकरत्न प्रतिष्ठानच्या वतीने कासेगांवचे माजी सरपंच स्व. श्रीकांत वाडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी बाबुराव साळुंखे, बालाजी दिकोंडा, भिमराव पाथरुड, विठ्ठल व्होरडे, अरविंद कुलकर्णी आणि इक्बाल जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शामराव वाघमारे होते.

यावेळी शाळेस दिलेल्या मदतीबद्दल निलेश कानडे व यशपाल वाडकर यांचे संस्था सचिवा लक्ष्मीबाई इटकर, श्रीनिवास इटकर, संजीवकुमार इटकर, सुरेश इटकर यांनी धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले तर बालाजी दिकोंडा यांनी उपस्थितांचं आभार मानले.

To Top