सोलापूर : क्षेत्रीय भेट अभ्यासक्रम अंतर्गत पोलीस आयुक्तालयातील आपत्कालीन प्रतिसाद पथक डायल ११२ नियंत्रण कक्ष सोलापूर शहर येथे मॉडर्न स्कूल, सोलापूर येथील इ. ०९ वी चे १२० विद्यार्थी पोलीस आयुक्त कार्यालय येथे सदिच्छा भेट देऊन डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईन ची सविस्तर माहिती घेतली. डायल ११२ सारख्या सेवांचा नागरीकांना, विद्यार्थी-विद्यार्थीनींना तात्काळ अडचणीचे वेळी मदत कशी मिळवता येते, याबद्दल मॉडर्न स्कूल सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यासोबतच सायबर पोलीस ठाणे येथे सायबर फसवणुकीबाबत सुध्दा माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात एक छोटेखानी आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे
त्यांनी विद्यार्थांना कायदा व सुव्यवस्था पोलिसांची भुमिका, सामाजिक जबाबदारी आणि डायल ११२ सारख्या सेवांचा नागरीकांना कसा उपयोग होतो, याबद्दल माहिती दिली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.
पोलीस दलाचे कार्य जवळून अनुभवण्याची आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या प्रणालीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची जाणिव आणि सामाजिक भान अधिक वाढल्याचे दिसून आले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, राजन माने, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, उदयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक (मा.सं. विकास), विकास देशमुख, पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, श्रीशैल गजा, पोलीस निरीक्षक (सायबर पोलीस ठाणे), अरुण फडके, सुपरवायझर अधिकारी डायल ११२, तसेच डायल ११२ व सायबर सेल येथील पोलीस अंमलदार, मॉडर्न स्कुल चे सचिव कुलकर्णी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.