डीबीटीद्वारे लाभ मिळण्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावण बाळ व राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी करावी तात्काळ माहिती सादर

shivrajya patra

सोलापूर : शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांकरिता यापूर्वी बीम्स प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या अर्थसहाय्याचे वितरण तहसिल स्तरावरून बँकेत पाठवून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग केले जात होते.

तथापि, महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार माहे डिसेंबर २०२४ पासून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यनिवृत्ती वेतन या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान राज्य शासनामार्फत डी.बी.टी. प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.

त्या अनुषंगाने सदर योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांची माहिती दिनांक ३१ जुलै २०२५ पूर्वी डी.बी.टी. प्रणालीवर भरण्याची कार्यवाही १०० टक्के तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना इकडील कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सदर योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांची माहिती डी.बी.टी. पोर्टलवर भरणे व त्यांचे आधार पडताळणी करण्याचे कामकाज सुरू आहे. तरी बऱ्याच लाभार्थ्यांनी सदर बाबत इकडील कार्यालयात हयात प्रमाणपत्र किंवा संबंधित लाभार्थ्यांची माहिती डी.बी.टी. पोर्टलवर अपलोड करणेकामी आवश्यक कागदपत्रे कार्यालयास सादर केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना अनुदानाचा लाभ घेता आलेला नाही. अशा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही डी.बी.टी. पोर्टलवर माहिती अपलोड केलेली नाही, त्यांची यादी खालील ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे.

कार्यालयांची नावे व पत्ता :- 

१. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कसबे सोलापूर, उत्तर सोलापूर, 

२. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, सलगरवाडी, उत्तर सोलापूर, 

३. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, बाळे, उत्तर सोलापूर, 

४. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, खेड, उत्तर सोलापूर, 

५. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, मजरेवाडी, उत्तर सोलापूर, 

६. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कुमठे, उत्तर सोलापूर, 

७. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कोंडी, उत्तर सोलापूर, 

८. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, बी. बी. दारफळ, उत्तर सोलापूर, 

९. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, पाकणी, उत्तर सोलापूर, 

१०. ग्राम ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, केगांव, उत्तर सोलापूर, 

११. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, शिवाजी नगर, उत्तर सोलापूर, 

१२. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, दहिटणे, उत्तर सोलापूर, 

१३. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, हगलूर व हिप्परगा, उत्तर सोलापूर, 

१४. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, राळेरास, उत्तर सोलापूर, 

१५. ग्राम महसूल अधिकारीकार्यालय, सोरेगांव, उत्तर सोलापूर, 

१६. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, प्रतापनगर, उत्तर सोलापूर, 

१७. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, उत्तर सोलापूर, 

१८. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नंदूर व भाटेवाडी, उत्तर सोलापूर, 

१९. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, तिन्हे, उत्तर सोलापूर, 

२०. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, डोणगांव, उत्तर सोलापूर, 

२१. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, पाथरी, उत्तर सोलापूर, 

२२. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, देगांव, उत्तर सोलापूर, 

२३. महसूल अधिकारी कार्यालय, हिरज, उत्तर सोलापूर, 

२४. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कवठे, उत्तर सोलापूर, 

२५. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, मार्डी, उत्तर सोलापूर, 

२६. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नरोटेवाडी, उत्तर सोलापूर, 

२७. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, बाणेगांव, उत्तर सोलापूर, 

२८. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नान्नज, उत्तर सोलापूर, 

२९. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, अकोलेकाटी, उत्तर सोलापूर, 

३०. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कारंबा, उत्तर सोलापूर, 

३१. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, वडाळा, उत्तर सोलापूर, 

३२. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, दारफळ गावडी, उत्तर सोलापूर, 

३३. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, रानमसले, उत्तर सोलापूर, 

३४.ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, पडसाळी, उत्तर सोलापूर, 

३५. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, वांगी, उत्तर सोलापूर, 

३६. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कळमन, उत्तर सोलापूर, 

३७. ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, साखरेवाडी, उत्तर सोलापूर, 

३८. मा.विभागीय अधिकारी सोलापूर क्र. ०१, सोलापूर, 

३९. तहसिलदार, शहर संजय गांधी, सोलापूर, 

४०. परिमंडळ अधिकारी 'अ' विभाग कार्यालय, सोलापूर, 

४१. परिमंडळ अधिकारी 'ब' विभाग कार्यालय, सोलापूर, 

४२. परिमंडळ अधिकारी 'क' विभाग कार्यालय, सोलापूर, 

४३. परिमंडळ अधिकारी 'ड' विभाग कार्यालय, सोलापूर, 

४४. विभागीय कार्यालय क्र. १, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

४५. विभागीय कार्यालय क्र. २, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

४६. विभागाी कार्यालय क्र. ३, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

४७. विभागीय कार्यालय क्र. ४, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

४८. विभागीय कार्यालय क्र. ५, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

४९. विभागीय कार्यालय क्र. ६, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

५०. विभागीय कार्यालय क्र. ७, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

५१. विभागीय कार्यालय क्र. ८, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

५२. धनकचरा विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 

५३. उद्यान विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

तरी वरील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील लाभार्थी यांनी तात्काळ आपली माहिती अपलोड करणेकामी बँक पासबुक, आधार कार्ड, (आधार कार्ड व मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक व अपलोड) मोबाईल नंबर (आधार कार्ड लिंक असलेले), शिधापत्रिका, अपंग प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बाबतीत पतीचा मृत्यू दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन दिनांक ३१ जुलै पूर्वी संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय, उत्तर सोलापूर, जुने कंकूबाई नेत्र रुग्णालय, शासकीय रुग्णालयाजवळ, सोलापूर येथे संपर्क साधल्यावर डी.बी.टी. प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल. जे लाभार्थी डी.बी.टी. प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणेकामी, ३१ जूलै पूर्वी आवश्यक कागदपत्रे इकडील कार्यालयास सादर करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचेकडून करण्यात येत आहे. 

तसेच ज्या लाभार्थ्यांची माहिती विहित मुदतीत प्राप्त होणार नाही अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येतील, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे उत्तर सोलापूर चे तहसीलदार निलेश पाटील यांनी कळविलं आहे.

To Top