चोरीच्या १५ मोटार सायकली जप्त; शहर गुन्हे शाखेची कामगिरी

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सपोनि/शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकाने मालाविषयी गुन्हे करणारे आरोपींचा शहर हद्दीत शोध घेत असताना एक संशयीत तपास पथकाने संशयीत कृष्णात ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे (वय- २५ वर्षे) आणि शुभम भागवत सावंत (वय- २८ वर्षे) या दोन तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले. उभयतांच्या ताब्यातून चोरीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहर गुन्हे शाखेच्या या उल्लेखनिय कामगिरीत उभयतांकडून ०७, ७०, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

१५ जुलै रोजी शेळगी रोडवर मोटारसायकल घेऊन थांबलेल्या संशयिताविषयी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार शहर गुन्हे शाखेचे सपोनि धायगुडे व त्यांच्या तपास पथकाने तरुणास ताब्यात घेऊन विचारपूस करता, त्याचे नाव कृष्णात ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे (वय २५ वर्षे, रा. मु.पो. मंगरुळ, ता. तुळजापूर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यानं सोलापूर शहर, लातूर, पुणे, इंदापुर, भिगवण, रत्नागिरी, बिदर (कर्नाटक) अशा विविध ठिकाणांवरून १२ मोटार सायकली चोरल्याची खळबळजनक कबुली दिली.

त्यांनतर, सपोनि शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार पोकॉ/काशिनाथ वाघ यांनी तसेच, इतर पोलीस अंमलदार यांनी, नमूद आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने, चोरी केलेल्या १२ मोटार सायकली काढून दिल्या. 

त्याच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे - जोडभावी पेठ (अॅक्टीव्हा MH 42 BL 2414), फौजदार चावडी (एच.एफ डिलक्स MH 13 DF 8678), जेलरोड (एच. एफ. डिलक्स MH 13 CM 8323), टेंभुर्णी सोलापूर ग्रामीण (युनिकॉर्न MH 45 AY 1804), इंदापूर पो.स्टे. पुणे (होंडा शाईन MH 42 AM 9881), गांधी चौक पो.स्टे. लातूर (एच. एफ. डिलक्स ΜΗ 24 ΒΑ 8665), एम.आय.डी.सी. लातूर (होंडा शाईन MH 24 BV 5840), रत्नागिरी शहर (मेटीयुआर बुलेट रॉयल इनफील्ड ΜΗ 24 BH 6660), चर्तुश्रृंगी पो.स्टे. पुणे (होन्डा शाईन MH 15 EW 2638), दिघी पो. स्टे. पिंपरी चिंचवड (सी.डी. डिलक्स MH 12 KL 0925), अभिलेख तपासावर (हिरो स्प्लेन्डर KA 39 R 7709 ) आणि अभिलेख तपासावर (बजाज बॉक्सर) या मोटारसायकलींची एकूण किंमत ०६, ३०, ००० रुपये असल्याचं सांगण्यात आलंय.

सपोनि शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी ०९ जुलै रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार शुभम भागवत सावंत (वय २८ वर्षे, रा. चिंचोली, ता. तुळजापुर, सध्या मु.पो. मंगरुळ, ता. तुळजापुर) यास, सोलापूर शहराचे, जुना पुणे नाका येथील ब्रिजजवळचे ठिकाणाहून चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याच्याकडे अधिक विचारपूस करता, त्याने, सोलापूर शहरामध्ये ०३ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. 

फौजदार चावडी पोलीस ठाणे (बजाज बॉक्सर MH 13 V 4170), एम आय डी सी पोलीस ठाणे (स्प्लेन्डर प्लस ΜΗ 13 ΑΚ 7062) आणि सदर बझार पोलीस ठाणे (फॅशन प्लस MH 13 AD 8270) येथील चोरीच्या गुन्ह्यातील ०१,४०,००० रुपयांच्या ०३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेकडील, सपोनि धायगुडे व त्यांच्या तपास पथकाने, आरोपी कृष्णाथ ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीच्या १५ मोटार सायकली जप्त केल्या. उभयतांकडून  ०७,७०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कामगीरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबर पोलीस ठाण्याकडील अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छींद्र राठोड यांनी पार पाडली.

To Top