वकिलांची सुरक्षितता धोक्यात ! मोहोळ बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

shivrajya patra

मोहोळ : राज्यात अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लवकर लागू करावा, या एकमेव मागणीकरिता मोहोळ बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि चेअरमन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा करिता मिलिंद थोबडे यांना निवेदन देण्यात आले.

मोहोळ वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. इरफान पाटील यांना मोबाईलवर व्हॉटस् अॅप मेसेज करुन विरोधी पक्षकाराकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली व अपशब्द लिहिलेला मजकूर पाठविण्यात आला होता, यामुळे आता वकिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याची आहे.

या अगोदर ही महाराष्ट्रामध्ये अनेक वकिलांना विरोधी पक्षकारांकडून त्रास होत आलेला आहे, त्यामुळे वकीलांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. त्यामुळे अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लवकर लागू करावा, या एकमेव मागणीकरिता सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व चेअरमन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा करिता मिलिंद थोबडे यांना मोहोळ वकील संघामार्फत निवेदन देण्यासंबंधी मोहोळ वकील संघात बैठक पार पडली. त्यावेळी मोहोळ वकील संघातील बहुसंख्य वकील हजर होते. 

त्याप्रमाणे वकील संघातर्फे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व  चेअरमन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा करिता मिलिंद थोबडे यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी मोहोळ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कृष्णात चौधरी तांबोळे, उपाध्यक्ष अॅड. इरफान पाटील, सचिव अॅड. श्रीदेवी काटे, खजिनदार अॅड. यल्लाप्पा वाघमोडे, ग्रंथपाल अॅड. रमेश पाटील, सोलापूर वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, सोलापूर वकील संघाचे सदस्य अॅड. राजेंद्र फताटे, अॅड. असीम बांगी, तसेच मोहोळ वकील संघाचे सदस्य अॅड. विशाल गावडे, अॅड. सोनल जानराव, अॅड. सिरसट, अॅड. सौदागर गुरव, अॅड. प्रथमेश आदलिंगे, अॅड. प्रेमनाथ सोनवणे, अॅड. विनीता गहलोत, अॅड. इमरान पाटील, अॅड. ज्ञानेश्वर एडगे, अॅड. प्रमोद जानराव, अॅड. वाघमारे, अॅड. मनोजकुमार भालेराव, अॅड. तुकाराम आगलावे, अॅड. कापुरे आदी बहुसंख्य वकील उपस्थित होते.

To Top