सोलापूर : येथील दमाणी नगर गवळी वस्तीतील रहिवासी महादेव नामदेव जाधव यांचं वृद्धापकाळात गुरुवारी, १७ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले. ते मृत्यूसमयी ८५ वर्षीय होते.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघून देगांव रोड कोयनानगर येथील स्मशानभूमीत गुरुवारी रात्री अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी गवळी वस्ती, दमाणी नगर परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. द न्यूज प्लस चैनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांचे ते सासरे होत.