आई-वडिलांवरती प्रेम करणारी पिढी निर्माण करू या : सेवा फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश राठोड

shivrajya patra

गोरपिठ येथे  मुलांनी आपापल्या आई-वडिलांची पूजा करून केली गुरू पौर्णिमा साजरी

सोलापूर : युवकांनी आपल्या आई-वडीलांना सन्मान द्यावा, त्यांची सेवा करावी, खूप प्रेम द्यावे, आई-वडिलांची काळजी घ्यावी. आई वडिलांविषयी खूप स्वाभिमान बाळगावं. अशी आई-वडिलांची सेवा करणारी पिढी घडवून, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई-वडिलांची पूजा करून प्रत्येक गुरुपौर्णिला साजरी करावी, आवाहन सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांनी केले.

सेवा फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या शुभ दिनी तीर्थक्षेत्र गोरपिठ प्रतापनगर तांडा सोलापूर येथे गादीश्वर प. पू. मोतायाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लहान-थोरांनी प्रथम गुरू असलेल्या आपल्या आई-वडिलांची मनोभावे पूजा करून गुरु पौर्णिमा साजरी केली. त्याच बरोबर आदिशक्ती माता, संत सेवालाल महाराज, संत हामुलाल महाराज, राष्ट्रसंत रामराव बापू, संत हुनाबापू या सर्व देवी देवतांचे देखील पूजा-अर्चा करण्यात आली. 

गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण गोरपिठ येथे आपल्या आई-वडिलांना घेऊन आले. त्यांचे चरण धुवून पुष्प अर्पण केले. यावेळी आई-वडिलांनी आपल्या मुलांना आशीर्वाद दिला.

यावेळी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ,माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

चौकट -

अनादी काळापासून गुरु परंपरा आजतागायत जिवंत आहे.  आपण शिष्य आहोत तर आपले गुरु कोणी तरी आहे. मग आपल्या गुरूंचे गुरु आहेत, त्या गुरूंचे कोणी तरी गुरू आहे. म्हणजे ही गुरूंची परंपरा कोणापासून सुरू झाली किंवा पहिले गुरु कोण हे संशोधनीय आहे.


To Top