सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे लेखक नाटककार राजा बागबान : डॉ. एम. ए. दलाल

shivrajya patra

रंगभूमीच्या सेवेसाठी "व्होग थिएटर मुंबई" कडून "लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५" प्रदान

सोलापूर : येणाऱ्या काळात समाजात जे लोकांसमोर जे समस्यांवर भाष्य करणारे लेखक नाटककार राजा बागबान आहेत. त्यांनी आपल्या जीवन प्रवासात एक उत्कृष्ट अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, लेखक या रूपात उर्दू, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेत आपले नाटक सादर केले. त्यांना आजवर विविध क्षेत्रातील जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, ही त्यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याची पावती आहे, असे गौरवोद्गार सोलापूर बागबान जमातचे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल यांनी काढले.

अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, लेखक राजा बागबान यांना उर्दू, मराठी, हिंदी रंगभूमीच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल "व्होग थिएटर मुंबई" कडून "लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५" प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त् सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक समितीतर्फे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या    अध्यक्षस्थानी सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नाटककार प्रा. बी. एच. करजगी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उप नगरीय शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंके, ज्येष्ठ नाट्यलेखक शिरीष देखणे आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

उर्दू घरचे सदस्य डॉ. शफी चोबदार यांनी गौरव सोहळ्याच्या प्रास्ताविक केले. ज्यात या सत्कार समारंभ आयोजित करण्यामागचा उद्देश विषद केला. त्यानंतर उर्दू घरच्या सदस्या डॉ. सुमैय्या बागबान यांनी राजा बागबान यांच्या विविध भाषांतील नाटककार, दिग्दर्शक, लेखक तसेच अभिनेता म्हणून केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. 

राजा बागबान हे सर्व भाषांमध्ये आपले नाटक सादर केले आहे. त्यांनी सोलापुरात पार पडलेल्या विविध नाट्य संमेलनात त्यांना जी जबाबदारी दिली, ती उत्कृष्टपणे पार पाडली. त्यांनी मराठी नाट्य संमेलनात एक उत्कृष्ट मराठी नाटक सादर करून अनेक पारितोषिकेही मिळवले, ते माझे एक चांगले सहकारीसुध्दा आहे, असं विजय साळुंके यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी पानगल हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. हारून रशीद बागबान, ज्येष्ठ साहित्यिक अय्युब नल्लामंदू, ग्रंथपाल जाफर बांगी आपले मनोगतात राजा बागबान यांचे कार्याचा उल्लेख केला.  

यावेळी उर्दू घरचे सदस्य मो. अय्याज शेख, अ. मजीद शेख, सरफराज बल्लोलखान, ग्रंथपाल साहिर नदाफ, मो. इक्बाल बागबान, पथनाट्य रंगकर्मी आशुतोष नाटकर, शरीफ इंडीवाले, महेबुब कुमठे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेमूद नवाज यांनी तर सरफराज बलोलखान यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

To Top