सोलापूर : भारत मुक्ती मोर्चा सोलापूर च्या वतीने सोमवारी, १४ जुलै रोजी सायंकाळी ०६ वा. येथील शिवछत्रपती रंगभवन येथे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाचे उद्घाटन जमिअत उलेमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना इब्राहिम यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रबोधन संमेलनात देशातील सार्वजनिक निवडणुका ह्या इ.व्ही.एम. ऐवजी मत पत्रिकेवर घेणे म्हणजे भारतातील लोकशाहीला वाचवण्याचे महत्वाचे पाऊल ठरेल, यासह विविध ०६ विषयावर एक चर्चा होणार आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम (नवी दिल्ली) संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे.
यावेळी अतिथी म्हणून युवराज पवार (अध्यक्ष मातंग समाज), शाम कदम (प.म. अध्यक्ष संभाजी ब्रिगेड), फारुख शेख (संस्थापक- छ. शि. म. मु. ब्रिगेड), राजा कदम (सरचिटणीस- प. महा. भीमशक्ती), मिलिंद प्रक्षाळे (जिल्हाध्यक्ष- भीमशक्ती सामाजिक संघटना), संजय जोगीपेठकर (प्रसिध्द साहित्यीक, सोलापूर), उत्तम नवघरे (संस्थापक- डॉ. आंबेडकर युथ असोसिएशन.) शफीक काझी (सचिव- सद्भावना मंच), दिनेश जाधव (शहर अध्यक्ष- गौर सेना, सोलापूर) तर मौलाना हारीस (उपाध्यक्ष- जमियत उलेमा-ए-हिंद), सय्यद शाह वायेज (फुले शाहू आंबेडकर विचार, मुस्लीम मंच, सोलापूर), सुधीर कांबळे (जिल्हाध्यक्ष- प्रोटॉन), भाऊसाहेब कांबळे (कार्य निष्पादन समिती, बामसेफ), रामस्वामी मनलोर (सामाजिक कार्यकर्ता, मोची समाज), गणेश उजगिरे (सोशल मिडिया प्रभारी), भारत दळवी (भा.मु. मो.), सिद्धार्थ बोराडे (भा.मु.मो.), महेंद्र सोनवणे, तानाजी बोकेफोडे (भा.मु.मो.), इंजि. एन. डी. भोसले, गौतम खरात, तुकाराम बनसोडे ( BIN), आर. बी. बनसोडे (NAPS), तुकाराम राऊत (BMP) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रबोधन संमेलनास मूळनिवासी बहुजन समाजातील उपस्थित राहून तन, मन, धनाने सहकार्य करावं, असं आवाहन अॅड योगेश शिदगणे (प्रदेश प्रवक्ता-बी. एम. पी.), अशोक गायकवाड (जिल्हाध्यक्ष-भा. मु.मो.), राजु तुळसे (भा. मु. मो.) प्रशांत गायकवाड, सुनिल भोसले, राजकमल हटकर, योगेश दुणगे, गणेश मंदापुरे, अभिषेक शिंदे, विवेक शिंदे, फिरोज शेख, अशफाक शेख, सिध्दार्थ शिंगे यांनी केलं आहे.
...या विषयांवर होईल चर्चा !
या प्रबोधन संमेलनात-
१) देशातील सार्वजनिक निवडणूका ह्या इ.व्ही.एम. ऐवजी मत पत्रिकेवर घेणे म्हणजे भारतातील लोकशाहीला वाचवण्याचे महत्वाचे पाऊल ठरेल... एक चर्चा...
विषय- २) ओ.बी.सी. जाती समुहाची जाती आधारित जनगणना करण्याची घोषणा करणे, परंतु जनगणनेची अंमलबजावणी न करणे हे ओ.बी.सी. समुहासोबत शासक जातीची धोकाधडी नाही काय?... एक मंथन...
विषय- ३) आर.एस.एस., बीजेपी च्या द्वारे बहुजन महापुरुषांचा वारंवार जाणीवपूर्वक अवमान करणे हे शासक जातीचे षडयंत्र...
विषय- ४) वक्फ संशोधन विधेयक २०२५ हे संविधानाच्या मुळ सिध्दांताच्या विरोधात आहे. एक चर्चा...
विषय- ५) महाबोधी टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द केल्याशिवाय महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही
विषय- ६) संघटनेच्या उद्देश्य व विचारधारेशी पुर्णपणे सहमत होऊन, शिस्तीचे पालन करून केन्द्रीय कार्यप्रणालीनुसार कार्य केल्यास, जनआंदोलन निर्माणानेच व्यवस्था परिवर्तन शक्य आहे.
... हे असतील प्रमुख वक्ते -
सुबोध वाघमोडे (प्रदेश सरचिटणीस- भीमशक्ती सामाजिक संघटना), अॅड. शैलेश पोटफोडे (मातंग समाज कृती समिती, सोलापूर), शेखर बंगाळे (संस्थापक- अध्यक्ष संघर्ष सेना), उषा थोरात (बामसेफ-महिला प्रभारी, महाराष्ट्र), फादर रविराज चंद्रकर (अध्यक्ष- राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा), धनश्री शिदगणे (जिल्हाध्यक्ष- भारत मुक्ती मोर्चा-महिला), अशोक आगावणे (अध्यक्ष- राष्ट्रीय रविदास परिषद), सुनीता कसबे (प्रदेश उपाध्यक्ष- बहुजन मुक्ती पार्टी.)