माजी नगराध्यक्ष जे. टी. लिमये गुरुजी यांच्या स्मृतीदिनी शैक्षणिक साहित्य वाटप

shivrajya patra

धाराशिव : उमरगा तालुक्यातील मुरूम शहराचे माजी नगराध्यक्ष जे. टी. लिमये गुरुजी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त उमरगा जनता बँकेचे चेअरमन आणि भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.

मुरूम शहरातील जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेत शनिवारी, १२ जुलै रोजी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. जवळपास 120 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याते आले. प्रमुख पाहुणे म्हणून शरण बसवराज पाटील यांची उपस्थिती होती. प्रमोद कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी स्मृतिशेष जे. टी. लिमये गुरुजी यांच्या आठवणींना विचारपीठावरील उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मलकुमार लिमये यांनी केलं तर शरण पाटील, प्रमोद कुलकर्णी, धम्मचारी धम्मभूषण आणि विश्वभूषण लिमये यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ख्याडे सर यांनी केलं, तर आनंदकुमार कांबळे यांनी आभार व्यक्त केलं.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे, सी. एल. गोडबोले, किरण गायकवाड, अवेज ढोबळे, अमर भोसले, बाबा शिकलगर, अण्णाराव कांबळे, राहुल गायकवाड, प्रशांत मुरूमकर, राजू मुल्ला उपस्थित होते.

To Top