ब्रिलियंट ग्रुपच्या वतीने १५ मान्यवरांना पुरस्कार प्रदान

shivrajya patra

सोलापूर : ब्रिलियंट ग्रुप ब्रिलियंट टाइम्स व यु-ट्युब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १९ जुजै रोजी सकाळी येथील डफरीन चौक परिसरातील असलेल्या इंडियन हॉल मध्ये आयोजित समारंभात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या १५ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या समारंभात मल्लिनाथ रुपनर, सौ. मंगल वाघमारे, सौ. मनीषा कांबळे, हरुण बंदूकवाले, जब्बार काशीम  शिकलगार, निजामुद्दीन अहमद अली आतार  (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेल्वे कॉलनी होटगी, सोलापूर) गौतम कांबळे, अखलाक शेख, राजेंद्र चव्हाण, सुहास जोशी आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार समितीत एम. ए. शेख, इजाज शेख, ॲड. पंकज कांबळे, रशीद पठाण , जी. एम. नदाफ, दीपक मठ, प्रभाकर कुंभार, संतोष जत्ती, सुनील रोडगे, शफी शेख, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, रहिमबक्ष बागवान, व्यंकटेश जोगी, संजय कुंडल, सुनील खांडेकर, महंतेश कलुरकर व संजय सिरसट यांचा समावेश होता, असं यावेळी सांगण्यात आलंय.

To Top