लोकरत्न स्व. श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या 29 व्या स्मृतिदिनी ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव चे लोक रत्न, माजी सरपंच आणि दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे तत्कालिन सदस्य स्व. श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या 29 व्या स्मृतिदिनी लोकरत्न परिवार संपर्क कार्यालयात स्व. श्रीकांत बप्पा वाडकर यांना ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली अर्पित करुन अभिवादन करण्यात आले.  

प्रारंभी आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी भगवान चौगुले, सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते स्व. श्रीकांत नागनाथ उपाख्य बप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. 

यावेळी लोक रत्न परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा माळी महासंघाच्या जिल्हा सचिवपदी मिट्टू हेडे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त धाराशिव मूकबधिर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भगवान चौगुले यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच यशपाल वाडकर, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष संजय पवार, आदर्श शिक्षक भगवान चौगुले, महेश वाडकर इत्यादींनी आपल्या मनोगतात स्व. बप्पा यांच्या स्मृतिंना उजाळा दिला. शेवटी प्रदीप माने यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले, रामहरी पाटोळे, सत्यपाल वाडकर, जालिंदर गायकवाड, निशिकांत पाटील गोरख वाडकर, विलास वाडकर, मोहन वाडकर, ताजुद्दीन शेख, अल्लाउद्दीन शेख, लक्ष्मण पवार, जनार्दन काळे, राजकुमार वाडकर, महेश वाडकर आणि हनुमंत मुटकुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

To Top