समाज सक्षम करण्यासाठी ज्येष्ठांनी घालून दिलेला आदर्श तरुणाईनं अंगिकारावा : नसीरअहमद खलिफा

shivrajya patra

सोलापूर : समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण महत्वाचं आहे. समाजाचा प्रत्येक माणूस सक्षम करण्यासाठी ज्येष्ठांनी घालून दिलेला आदर्श तरुणाईनं अंगिकारावा असं आवाहन महाराष्ट्र बागवान एज्युकेशन ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी नसीरअहमद खलिफा यांनी  केले.

सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट संचलित बागवान जमियत युवक संघटना स्थापना दिनाच्या निमित्ताने शनिवारी, 19 जुलै रोजी रक्तदान शिबिर, युवक मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरात 280 हून अधिक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट संचलित बागवान जमियत युवक संघटनेने पाच्छा पेठ येथील KMC गार्डन मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचं सहायक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी नसीरअहमद खलिफा बोलत होते. 

त्यांच्यासोबत मंचावर शहर काझी अमजद हुसैन, जमियतचे अध्यक्ष, बागवान जमियतचे सदस्य तसेच समाजातील अन्य मान्यवर आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या युवक मेळावा व सत्कार सोहळा शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सत्कार करून गौरविण्यात आले.

याप्रसंगी नवीन पदाधिकाकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मुश्ताक अ. रज्जाक बागवान, कार्याध्यक्ष सरफराज शेख, उपाध्यक्ष मुबश्शिर सलीम तुळजापरे, नूरहमद युसुफ बागवान, सचिव डॉ. अब्दुसलाम बागवान, खजिनदार: उमर रामपुरे, आर्थिक सल्लागार नवाज  बागवान, सहसचिव लियाकत बागवान, बाबा सिंदगी, जावेद बागवान, मतीन मैंदर्गी, मीडिया प्रमुख वसीम राजा बागवान, मुझफ्फर बागवान संघटक: आदम बागवान, इसाक बागवान या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

रियाज बागवान (अध्यक्ष), नसीम खलीफा, मुजीब खलिफा, अफजल शेख (सौदागर), इमरान बागवान, उमर मर्चंट, इब्राहीम मैंदर्गी, एजाज बागवान, जमीर रामपुरे, खालिद वकील, रिजवान बागवान यांचा सल्लागार समितीत समावेश आहे.

या कार्यक्रमास बागवान जमियतचे युवक, सदस्य आणि समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 

***

To Top