सोलापूर : संत गजानन महाराज पालखीचे रविवारी, 29 जून रोजी सोलापूर शहरामध्ये मुक्काम असून, कुचन प्रशाला येथील पालखीच्या मुक्काम स्थळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. 
यावेळी आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते, तर दिंडी प्रमुखांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले.
...मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
सोलापूर : श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे शनिवारी, 28 जून रोजी सोलापूर जिल्ह्यात उळे येथे आगमन झालेले होते. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत करण्यात आले. 
तर रविवारी, पालखी शहरातील प्रभाकर महाराज मठात आलेली असून येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले.
