सोलापूर : राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीदिनी, 26 जून रोजी नियोजित शाक्यसंघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कोल्हापुरातील ऐतिहासीक दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांना विशेष ड्रेसकोडमध्ये बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली.
नियोजित शाक्यसंघ सामाजिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रथमच ऐतिहासिक दसरा चौक, कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीदिनी विशेष ड्रेस कोडमध्ये मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख (कोल्हापूर) योगेश कुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद कोल्हापूर) एस. कार्तिकेयन, आयुक्त महानगरपालिका के. मंजूलक्ष्मी, अखिल भारतीय मराठा महासंघचे वसंतराव मुळूक, तज्ञ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, राजर्षी शाहुजी सलोखा मंच (कोल्हापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी विविध सामाजिक संघटना, तसेच शाहुजीप्रेमी व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला सांगितले होते की, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा, असा संदेश दिला होता. या भावनेतून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जन्म भूमीत अभिवादन करण्यासाठी सोलापूर, पुणे, बीड, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातून विशेष ड्रेसकोडमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बौध्द उपासक व उपासिका प्रथमच हजर होत्या.
त्यानंतर या विशेष पथकाने शाहुजी महाराज चित्रमय प्रदर्शन, शाहुजी जन्मस्थळ, शाहूजी समाधी स्थळ यासह छत्रपती शाहु महाराज यांचं सानिध्य लाभलेल्या वास्तुंना भेटी दिल्या.
याप्रसंगी अशोककुमार दिलपाक (नियोजित शाक्यसंघ संघटक, महाराष्ट्र राज्य), सुभाष सर्वगोड (अध्यक्ष शाक्यसंघ शौर्य विजयस्तंभ, पुणे), गोविंद जगताप (सचिव), अशोक शेलार, बाबाबसाहेब माने, कैलास रणपिसे, फुलचंद वाघमारे, विष्णू गायकवाड, संजय सोनवणे, प्रकाश सावंत, अरुण ओहोळ, दादाराम थोरात, ज्ञानोबा अडसुळे (सर्व पुणे), अशोक कांबळे, शहाजी कांबळे (कोल्हापूर), सुरेश साबळे, कल्याण भंडारे, सुभाष चोपडे, अशोक ठोकळ, तानाजी शिंगारे, अशोक सोनवणे, श्रीपती मस्के, भास्कर खांडेकर, मच्छिद्र वडमारे, विजयकुमार निकाळजे (सर्व बीड),नियोजित शाक्यसंघ महिला ब्रिगेड (महाराष्ट्र राज्य)सागरबाई ओहोळ (पुणे), चंद्रकला सावळे, लता चोपडे, रत्नप्रभा भंडारे, कार्तिकी सोनवणे, उर्मिला मस्के (सर्व बीड) बहुसंख्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व शाक्यसंघ महिला बिग्रेड महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक संघटना व शाहुप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
