तीन प्लॅट च्या विक्री-खरेदीत १.०३ कोटी रूपयांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : तीन प्लॅटची विक्री करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून १,०३,७६००० रूपयांची फसवणूक झालीय. ही घटना ऑगस्ट २०२२ ते १२ जून २०२५ रोजी दरम्यान दुय्यम निबंधक वर्ग-२ उत्तर सोलापूर येथे घडलीय. याप्रकरणी अब्दुल रशीद अब्दुल गनी बाडीवाले (रा. सम्राट नगर, मजरेवाडी) याच्यासह दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सोलापुरातील रेल्वे लाईन्स ताज हॉटेल जवळील रहिवासी अनस बशीर शेख (वय-२८ वर्षे) दोघा आरोपींना इंम्पीरीअर टॉवर सर्व्हे नं ५४/६२ सम्राट नगर येथील प्लॅट क्र ५०१, ५०२, ३०१ हे विक्री करण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून प्लॅट खरेदीसाठी ९२,०६,००० रूपये घेतले व खरेदी खत करून देतो, असे म्हणून खरेदीखत करून दिले नाही.

दरम्यान बांधकामासाठी पैसे कमी पडले आहे, म्हणून अनस शेख यांच्याकडून आणखी ११,७०,००० रूपये अतिरिक्त घेऊन सुध्दा फिर्यादीचा विश्वासघात करून १,०३,७६,००० रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अनस शेख यांनी फिर्याद दाखल केली.

त्यानुसार अब्दुल रशीद अब्दुल गनी बाडीवाले आणि आसिफ इक्बाल नजीर सय्यद (रा-लुडस अपार्टमेंट, मोदी, सोलापूर) या दोन आरोपी विरुद्ध भा. न्या. संहिता कलम ३१८ (२), ३१८(४), ३ (५), म. ओनरशिप प्लॅटस अॅक्ट कलम १३(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरगुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top