Type Here to Get Search Results !

डॉ. वळसंगकरांना साश्रू नयनांनी निरोप; पोलिसांचा तपास अन् दाखल फिर्यादीमुळं प्रकरण वेगळ्या वळणावर



सोलापूर : मेंदू विकार तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडेचार च्या सुमारास विद्युत दाहिनी अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थितांनी त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यावेळी एस पी आय एन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना दुःख आवरता आले नाही. काहींनी हंबरडाच फोडला होता.

मेंदू व मज्जा संस्थेतील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या 69 वर्षीय डॉक्टर वळसंगकरांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी जीवनयात्रा संपविली. शनिवारी पहाटेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सिव्हिलच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाच्या टीमकडून त्यांची उत्तरीय तपासणी  करण्यात आली. 

शवविच्छेदन दुपारी एक वाजता झाल्यानंतर पार्थिव सात रस्ता येथील घरी आणण्यात आले किती दुपारी चार पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी ०४ वाजून २० मिनिटांनी पार्थिव मोदी स्मशानभूमीत पोहोचले. विधी झाल्यानंतर साडेचार वाजता विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार आले. 

अंत्यविधीच्या वेळी त्यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर, बंधू डॉ. सतीश वळसंगकर, डॉ. नितीन ढेपे, डॉ. दत्तप्रसन्न काटीकर, डॉ. एस. प्रभाकरसह इंडियन मेडिकल असोसिएशन निमा व होमिओपॅथी संघटनेच्या पदाधिकारी समाजातील विविध स्तरातील मान्यवर, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार दिवसांनी जबाव - डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येविषयी कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येणार आहेत. सध्या ते दुःखी असल्याने चार दिवसानंतर त्यांचे जबाब घेण्यात येतील, अशी पोलिसांनी सांगितलं होतं, दरम्यान पोलिसांचा प्राथमिक तपास अन् शनिवारी रात्री च्या  दाखल फिर्यादीमुळं हे प्रकरण वेगळ्या वळणावर आलंय.