Type Here to Get Search Results !

सचिन जोकारे विमा सेवा केंद्राच्या वतीने महामानवास "एक पेन एक वही" उपक्रमाद्वारे अभिवादन

सोलापूर/सिद्धार्थ भडकुंबे : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' हा संदेश सकल समाजाला दिला. त्यानुसार आजमितीला तळागाळातील लोक मोठ्या प्रमाणात शिक्षित झाले, मात्र आजही दुर्गम भागातील अनेक मुला-मुलींना, तरुण-तरुणींना शिक्षण घेता येत नाही. 


गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापुरातील सचिन जोकारे विमा सेवा केंद्राच्या वतीने अर्थात LIC च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. जयंतीत अनावश्यक खर्च टाळत समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 'एक वही आणि एक पेन' व लाडू वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. 

प्रारंभी विमा सेवा केंद्राचे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे व संतोष मुगळी यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी विविध उच्चस्पद प्रशासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सचिन जोकारे विमा सेवा केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या 'एक वही एक पेन' या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या.

याप्रसंगी विमा सेवा केंद्राचे विमा प्रतिनिधी सचिन जोकारे, संतोष मुगळी, परशुराम चाबुकस्वार, सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.