Type Here to Get Search Results !

न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अनपेक्षित घटनेत घेतला जगाचा निरोप

सोलापूर : येथील वैद्यकीय क्षेत्रात घडलेल्या दुर्दैवी आणि अनपेक्षित घटनेत न्यूरोलॉजीमधील विशेषज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरात स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्यहत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री 8.30 वा. च्या सुमारास घडलीय.  कुटुंबियांनी गंभीर जखमी अवस्थेत त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांनी आजवर हजारो रुग्णांवर उपचार करून त्यांना नवजीवन दिलं, तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पुढं आलीय.

याबाबत मिळालेली प्रारंभिक माहिती अशी की, डॉ. शिरीष वळसंगकर यांची न्यूरोलॉजिस्ट म्हणून सर्वदूर ओळख आहे. त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी बेडरूममध्ये स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी रामवाडी येथील त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून प्रकृती अतिशय गंभीर आहे.

त्यांनी दोन गोळ्या झाडल्या, यापैकी एक गोळी डोक्यातून आरपार गेली आहे.ती आरपार गेलेली गोळी वरील काचेला लागून काचेला तडा जाऊन फुटली असल्याचे प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच, माध्यम प्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडं धाव घेतली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी राहतं घर आणि हॉस्पिटलकडं त्याची माहिती घेत असताना, कोणीही घटनेसंबंधी बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून आलंय. पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय. 

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं बोलण्यास कोणी पुढं आलं नव्हतं. त्यांच्या प्रकृतीसंबंधी अधिकृत घोषणा होण्यास विलंब लागणार आहे. डॉ. वळसंगकर यांची प्राणज्योत मालवलीय, त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेने एक-ना-अनेक मागे ठेवले आहेत.