'प्रति दिन, प्रति देशी गाय' अनुदान अंमलबजावणीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ

shivrajya patra

सोलापूर : पशुसंवर्धन विभागाच्या 08 ऑक्टोबर, 2024 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी 50 रुपये प्रति दिन, प्रति देशी गाय अनुदान योजनेकरीता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत व सदर शासन निर्णयामधील नमुद निकषानुसार पात्र गोशाळा, गोसदन पांजरापोळ व गोरक्षण संस्थांनी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत येत्या 30 जूनपर्यंत वाढविण्यात येत आहे.

योजनेचा उद्देश व स्वरुप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी, तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https//schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

या शासन निर्णयातील नमूद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाइन पध्दतीने विहित नमुन्यातील अर्ज उपरोक्त संकेतस्थळावर सोमवारी, 30 जूनपर्यंत सादर करावेत. महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.
To Top