विद्यार्थ्यांनो स्पर्धा परीक्षेला सामोरे जा : सिद्धाराम म्हेत्रे

shivrajya patra

समर्थ संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार 

सोलापूर : सध्या विद्यार्थ्यांचा इंजीनियरिंग व मेडिकलकडे अधिक कल दिसून येत आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. यामुळे देशाबरोबर समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. तसेच अधिकारी पदामुळे सन्मान देखील मिळतो, असे प्रतिपादन माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.

समर्थ शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंतांचा, टायपिंग आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव विजयकुमार उबाळे, सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, जोडभावी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज मुलाणी, एसव्हीसीएस भवानी पेठचे प्राचार्य राम ढाले, वीरशैव व्हिजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, संस्थेचे संस्थापक गुरुशांत बिराजदार उपस्थित होते.

संस्थेच्या सत्कार समारंभाचे यंदाचे 18 वे वर्ष होते. यावेळी दयानंद महाविद्यालय, शेळगी, भवानी पेठ आणि दक्षिण सोलापूर मधील 100 विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी  सोलापुर परीसरातील दहावी, बारावीतील विद्यार्थी, पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी संस्थेचे कौतुक करत सर्व विद्यार्थांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप क्षीरसागर यांनी केले तर गुरुशांत बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिवा शिवलिला बिराजदार, सुरेश बिराजदार, अकबर नदाफ, बसवराज जकापुरे, विश्वजीत शिर्के, सिद्राम जोडमोठे यांचे सहकार्य लाभले.


To Top