रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी च्या वतीने 100 रोपट्यांचं वृक्षारोपण

shivrajya patra

सोलापूर : पर्यावरणाचे संरक्षण हे रोटरी इंटरनॅशनलच्या सात प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक असून, या उद्दिष्टाशी सुसंगत राहून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांनी गुळवंची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान राबवले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांच्यावतीने ५०० वृक्ष लागवड मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, २२ जून रोजी गुळवंची येथे १०० रोपट्याची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचं उद्घाटन तालुका वनाधिकारी सचिन जोशी यांच्या हस्ते झाले. त्यांनी मार्गदर्शनाखाली 100 रोपे लावण्यात आली. यावेळी गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष अकबर नदाफ, सचिव बसवराज बिराजदार, प्रकल्प प्रमुख योगीनाथ कुडते, तसेच क्लबचे माजी अध्यक्ष महेश साळुंके, नागेश शेंडगे, सत्यम दुधनकर, गुळवंची ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि छावा प्रतिष्ठानचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अकबर नदाफ यांनी तर सूत्रसंचालन महेश साळुंके यांनी केले. शेवटी सचिव बसवराज बिराजदार यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

To Top