भंडारा/प्रतिनिधी : द अबॅकस वर्ल्ड ने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय आणि तुमसर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक देवांश पराग बारई, राज्यस्तरीय चॅम्पियन रँक विजेता क्रमांक श्लोक सुधाकर जगनाडे यांनी पटकावले. या यशाप्रित्यर्थ श्री ट्युशन क्लासेस आणि द वर्ल्ड अबॅकस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमगाव दिघोरी येथे यशवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण आणि सत्कार करण्यात आला.
दिघोरी आमगाव परिसरात अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी श्री ट्युशन क्लास आणि द वर्ल्ड अबॅकस चे संचालक स्वप्नील गजभिये मागील पाच वर्षापासून सतत अविरत कार्य करीत आहेत. क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून कला-गुणांना वाव देणे, शैक्षणिक उपक्रमात सहभाग वाढविणे, निरोगी आरोग्यासाठी योगा व ध्यान उपक्रम राबविणे, स्पर्धामध्ये टिकण्यासाठी सक्षम बनविणे, व्यसनापासून दूर ठेवणे, विद्यार्थी व पालक यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण करणे, तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, या सर्व बाबतीत श्री ट्युशन क्लास मागील अनेक वर्षे कार्य करीत आहे.
आमगाव येथे सुद्धा चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, नृर्त्य स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत सोनिया भुरे ने प्रथम क्रमांक पटकावला, लेवल वन मध्ये प्रथम क्रमांक अय्युब गोलांगे, द्वितीय क्रमांक वृषभ बेदरकर, तृतिय क्रमांक स्वरा शिंगाडे, बेस्ट विज्वलायझेशन प्राईज धन्वी विजयकांत भालाधरे, जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत विजय विद्यार्थी श्लोक सुधाकर जगनाडे, यश योगेश सार्वे, अय्युब ग्यानिवांत गोळंगे, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पॉल (प्रिन्सिपल सर सेंट पॉल इंग्लिश स्कूल भंडारा) कार्यक्रमाचे उद्घाटक नामदेव घोडमारे, प्राचार्य अबॅकस वर्ल्ड क्लासेस लाखनी, कार्यक्रमाचे मार्गदर्शक देवानंद चौधरी (सत्य साई सेवा समिती अध्यक्ष), प्रमुख पाहुणे अवी शिंगाडे, पोलीस पाटील टेकेपार होते.
कार्यक्रमाचे आयोजक स्वप्निल गजभिये (श्री बहुद्देशीय संस्था) हे होते,बोलताना वक्ते म्हणाले की, ब्रेन जिम आणि ऍबकस सारख्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सुप्त आणि बौद्धिक गुणांचा विकास करावा, असं आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष गजभिये म्हणाले की, विद्यार्थ्यांना अपयश पचवणे सोपे असते पण यश पचवणे कठीण असते. अपयशात मार्गदर्शन करू शकतात, परंतु यशामध्ये विद्यार्थी कुठल्याही गोष्टी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो, म्हणून विद्यार्थ्यांना यश आणि अपयश पचविण्याचे धडे शिकवावे, असं आवाहन त्यांनी पालकांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कुमुद चौधरी तर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी तथा मुक्त पत्रकार अभय रंगारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी-पालक वर्ग उपस्थित होते.
हा कार्यक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. भविष्यात असेच नवोपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील गजभिये यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.