सोलापूर : सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या जनसंपर्क व सह्याद्री फाउंडेशनच्या हैद्राबाद रस्त्यावर सिध्देश्वर मार्केट यार्डसमोर नव्याने सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्ताविक करताना नेताजी खंडागळे यांनी सांगितले की, “हे कार्यालय उळे, कासेगांव, बोरामणी पंचक्रोशीतील शेतकरी, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहील.”
यावेळी अक्कलकोट विधानसभा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नेताजी खंडागळे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या कष्ट, चिकाटी आणि जनसेवेचं कौतुक केले. त्यांनी नव्या कार्यालयाच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमास बोरामणी, मुळेगांव, तांदुळवाडी, कासेगांव, वडजी, वरळेगांव, बक्षीहिप्परगे, पिंजारवाडी, दोड्डी, मुळेगांव तांडा, गंगेवाडी, उळेवाडी, मुस्ती, संगदरी, उळे आदी गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.... चौकट
सह्याद्री फाउंडेशनचं कार्य !
२००७ सालापासून जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रात सह्याद्री फाउंडेशनचं कार्य आहे. नेताजी खंडागळे यांनी सह्याद्री फाउंडेशनमार्फत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात कार्य केलेलं आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसंपर्काबरोबरच सामान्य जनतेच्या ऑनलाईन कामाविषयीच्या समस्यांचं उकल होण्यास मोलाची मदत होणार आहे.
.... चौकट
... कार्यकर्ता म्हणून समाजात काम करण्याकडं माझा कल : आमदार सचिन कल्याणशेट्टी
राजकीय पटलावर आपली दर पाच वर्षाला परीक्षा येते, आपण लोकांना विसरलो तर गडबड होते. कार्यकर्त्यांनी आपलं घर प्रपंच सांभाळून राजकारण-समाजकारण करावं. राजकारणात काम करत असताना दिवसातून एकदा तास तरी आपला घर प्रपंच आणि परिवार बघितला पाहिजे. स्वतःला नेता म्हणून पाहण्याऐवजी कार्यकर्ता म्हणून समाजात काम करण्याकडं माझा कल असतो, असंही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी सांगितले.