7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 03 हजार रुपयांची लाच; तलाठी ए.सी.बी.च्या कचाट्यात

shivrajya patra

सोलापूर : खरेदी दस्तावरुन सात-बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती ०३ हजार रुपयांची लाच स्विकारणारा तलाठी ए.सी.बी. पथकाच्या कचाट्यात सापडला. अरुण मारुती शेवाळे (वय- ५३ वर्षे) असं तलाठ्याचं नांव आहे. त्याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची वहिनी यांनी अक्कलकोट तालुक्यातील मौजे तळेवाड येथील गट क्रं. ५७/४/ब क्षेत्र १ हेक्टर शेतजमीन सह दुय्यम निबंधक, अक्कलकोट यांच्याकडील खरेदी दस्त क्रं. ३७१३/२०२५, ०२ जून अन्वये रितसर खरेदी केली आहे. 

त्या खरेदी दस्तानुसार सात-बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तक्रारदाराने ग्राम महसुल अधिकारी अरुण मारुती शेवाळे (नेम-तहसिल कार्यालय, अक्कलकोट वर्ग- ३, सध्या रा. डवरे गल्ली, अक्कलकोट, मूळ रा. ६३-ब, वृंदावन पार्क, फेज-१, लोहगांव, पुणे) यांच्याशी संपर्क साधला असता, शेवाळे यांनी ०५ हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती ०३ हजार रूपयांची लाच रक्कम स्वतः स्विकारताना बुधवारी एसीबी च्या पथकाने रंगेहात पकडले. 

यात ला. प्र. वि. पुणे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांनी मार्गदर्शन अधिकारी, ला. प्र. वि. सोलापूर पोलीस उपअधिक्षक प्रशांत चौगुले पर्यवेक्षण अधिकारी तर सापळा पथकातील पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार एएसआय/एस. व्ही. कोळी, पोना/३० संतोष नरोटे, पोकॉ/७६६ गजानन किणगी, व चालक पोह/९८४ राहुल गायकवाड (सर्व नेमणुक- लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सोलापूर) यांनी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ई मेल - www.acbwebmail@mahapolice.gov.in, dyspacbsolapur@gmail.com

ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net

संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४

दूरध्वनी क्रमांक - ०२१७-२३१२६६८.

To Top