नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे मोहोळकरांना ' सजा-ए-पिला पाणी '; नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

shivrajya patra

मोहोळ/प्रतिनिधी: मे महिण्याच्या अवकाळी पावसानं सर्वत्र धुमाकूळ सुरु केला आहे. उन्हाळ्यात कोरडे असणारे नदी-नाले ओसंडून वाहत असून दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरणारे मोहोळकर नागरिक पिण्याच्या स्वच्छ पाण्याऐवजी  ' सजा-ए-पिला पाणी ' कटू अनुभव घेत आहेत, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मोहोळ नगरपरिषदेमार्फत मोहोळ शहराला पाणीपुरवठा होतो, सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असताना मोहोळवासीयांच्या नळाला येणारे पाणी गढूळ तसेच पिवळ्या रंगाचं पाणी येत आहे. सध्या शहराला होत असलेला दुषित  पाणीपुरवठा चिंतेचा विषय बनला आहे. या परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे मोहोळ नगरपरिषदेतील प्रशासक आणि अधिकारी यांचं दुर्लक्ष आहे. ते जणू 'धृतराष्ट्री' भूमिका बजावत असल्याने ते  नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित अधिकारी-कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे काही नागरिकांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

To Top