सोलापूर : अंजुमन-ए-इस्लामुल मुस्लिमीन मुंतझीम कमिटी आणि तन्झीम मोहिब्बा, रझा फॉरेस्ट सोलापूरच्या वतीने, वार्षिक शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली होती, या परिषदेत इयत्ता बारावी आणि दहावीमध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींना शाल-ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
अंजुमन-ए-इस्लामुल मुस्लिमीन मुंतझीम कमिटी आणि तन्झीम मोहिब्बा, रझा फॉरेस्ट या संस्था संयुक्तरित्या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाबरोबर मार्गदर्शन करण्याच्या उद्दात्त दृष्टीकोनातून दरवर्षी कार्यक्रम आयोजित करते. 
या कार्यक्रमात सोलापूर शहराच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर, मोटिव्हेट अशर अशफाक शेख (सायन्स डॅन) होते, त्यांनी विद्यार्थ्यांना, 'दहावी आणि बारावीनंतर पुढे काय...' याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी माजी महापौर आरिफ शेख, हाजी एम. डी. शेख, तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, शकील मौलवी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम गुरूवारी, २९ रोजी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 
याप्रसंगी संयोजक इंतेखाब शेख, संस्थेचे अध्यक्ष नसरुद्दीन नदाफ, सचिव मोहम्मद आकिब शेख, इरफान शेख, शरीफ तांबोळी, शकील शेख, जमील शेख, आरिफ बेरिया, सद्दाम शेख, झाकी शेख, इसाक शेख, एजाज शेख, ईशा शेख यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(शब्दांकन : गफूर सौदागर)
