साहस अन् स्वाभिमानाचे प्रतिक म्हणजेच महाराणा प्रतापसिंह : संतोष पवार

shivrajya patra

सोलापूर : महाराणा प्रतापसिंह भारतीय इतिहासात असे वीर होऊन गेले, ज्यांनी आपल्या वीरतेचा आदर्श समाजाला दाखवून दिला. वीरता, दृढ संकल्प,साहस, शौर्य, स्वाभिमानाचे प्रतिक म्हणजेच वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आहेत, त्यांनी देशभक्ती कशी असावी, प्राणार्पण कसे असावे हे त्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंतीनिमित्त गुरूवारी, 29 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सात रस्ता येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. 

यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांनी त्यांच्या मनोगतात, सोलापूर शहर-जिल्हावासियांना महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, VJNT सेल विभाग अध्यक्ष रूपेशकुमार भोसले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष आयुब शेख, सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, महिला आघाडी उत्तर विधानसभा अध्यक्ष उमादेवी झाडबुके, मध्य विधानसभा अर्चना दुलंगे, सरचिटणीस सुरेखा घाडगे, जयश्री झाडबुके, सुजाता काकडे, अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, निशांत तारा नाईक, अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष संजीव मोरे, नवरेज सज्जाद जहागिरदार, मुकुंद व्यास यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.

To Top