श्रीमती तबस्सुम बागवान जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी

shivrajya patra

धाराशिव : जिल्ह्यातील ढोकी जिल्हा परिषद शाळेतील श्रीमती तबस्सुम बागवान यांना स्वयंवर मंगल कार्यालयात भव्य सोहळ्यात आदर्श शिक्षिका पुरस्कार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथ.) धाराशिव यांच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२३-२४ पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन महाराष्ट्र दिनी, ०१ मे २०२५ रोजी करण्यात आलं होतं. या सोहळ्यात जिल्हा परिषद प्रशाला, ढोकी येथील शिक्षिका श्रीमती बेबी तब्बसूम बागवान यांना, त्यांच्या  शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तर शिक्षक पुरस्कार २०२३-२४ प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी विचारपीठावर धाराशिवचे खा. ओम राजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. प्रविण स्वामी यांच्या हस्ते श्रीमती बेबी तब्बसूम बागवान यांना मानाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुधा साळुंके, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिवचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुमारी तबस्सुम रशीद अहमद बागबान या मध्य रेल्वे व्हॉलीबॉल खेळाडू संघटना सोलापूर तर्फे "जीवन गौरव पुरस्कार" सन्मानित, भारतीय रेल्वेचे माजी व्हॉलीबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक रशीद अहमद बागबान (निवृत्त चीफ तिकीट निरीक्षक, मध्य रेल्वे सोलापूर) यांची सुकन्या आहेत. त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरविण्यात आल्यानं त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

To Top